मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर..

0
43

मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -हणमंतराव पाटील वाडेकर.. जाहूर/ मनोज बिरादार युवा मराठा न्युज बिलोली ; सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने नांदेड येथे वामनराव पावडे मंगल कार्यालयात दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील सकल मराठा समाजाने या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील वाडेकर यांनी केली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मराठा आरक्षण स्थगितीचा जाब विचारला जाणार असूनतसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र दादा पाटील हेराहणार असूनकार्यक्रमाचे उद्घाटन स्वाभिमानी संभाजी बिग्रेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या हस्ते होणार आहे तरी सकल मराठा समाज बांधवांनी या एल्गारमेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन हणमंतराव पाटील वाडेकर यांनी केले आहे.

Previous article*निमगांव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची पुण्यतिथी उत्साहात साजरी*
Next articleलोहा येथे आ. सतीश भाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी साधला संवाद.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here