*पालकमंत्र्यांच्या हाती ट्रँक्टर स्टेअरिंग कोल्हापूरात काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रँक्टर रँली*

0
41

*पालकमंत्र्यांच्या हाती ट्रँक्टर स्टेअरिंग कोल्हापूरात काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रँक्टर रँली*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांत असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्याचा विरोध करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या कायद्याविरोधात पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. अशीच ट्रॅक्टर रॅली कोल्हापुरात काढली आहे.
कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री मा.श्री. सतेज पाटील यांच्या नियोजनात सुरु असलेल्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.
निर्माण चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली असून दसरा चौक येथे रॅलीचा शेवट झाला. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटलांनी ट्रॅक्टरचं स्टिअरिंग स्वतःच्या हाती घेतलं असून मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत बसल्याचे पाहायला मिळाले.हे विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते की,
‘कृषी विधेयकाला आम्ही विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन देखील करत आहोत. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विरोध केला आहे. शिवसेनेचं मतदेखील तेच आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ’.
केंद्राचा नवा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला संपवणारा आहे. नव्या कायद्यात व्यापाऱ्याला मुक्तपणे परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल याची हमी या कायद्यात देण्यात आलेली नाही, ती हमी कृषी उत्पन्न बाजार समितींची होती. तसेच आधारभूत किंमतीत धान्य खरेदीत कृषी उत्पन्न बाजार समितीची महत्त्वाची भूमिका होती. केंद्राच्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संपेल. त्याचबरोबर आधारभूत किंमत मिळवण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे तीदेखील संपून जाईल’, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Previous article*!! विधी शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार बांधवाचा सन्मान…!!
Next article*नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच गावातील सुधारीत पैसेवारी जाहिर*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here