🛑 जिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे 🛑

0
48

🛑 जिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 01 नोव्हेंबर : ⭕ रिलायन्स जिओने वेगवेगळ्या कॅटेगरीत अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान युजर्ससाठी उपलब्ध केले आहेत. आज आम्ही तुम्हाला जवळपास एकाच किंमतीत असलेले रिलायन्स जिओचे दोन प्रीपेड रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. रोज २ जीबी डेटा ऑफर मिळणाऱ्या या प्लानमध्ये ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना काय-काय वेगळे बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या.

जिओच्या या ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ११२ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होवून ती 64Kbps होते.

या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर २ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये विना कोणतेही अतिरिक्त शूल्क न देता एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

५९९ रुपयांच्या जिओच्या या पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. रोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या या डेटाची लिमिट संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होवून ती 64Kbps होते. जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते.⭕

Previous article*शेतकरी विरोधी कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे पाच हजार सह्याचे निवेदन सादर*…….
Next article*बसस्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावीत*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here