*मौजे तग्याळ येथे शेतकऱ्याचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू*

0
50

*मौजे तग्याळ येथे शेतकऱ्याचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू*
जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी समजलेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील तग्याळ येथील रहिवासी श्री व्यंकटगणपत गोप नर वय वर्षे ४८ हा युवक काल संध्याकाळी सहाच्या सुमारास आपल्या स्वतःच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेला असता अचानक त्याचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला आहे सदरील घटना मुखेड तालुक्यातील तग्याळ यागावी घडली आहे विहिरीत पडल्याची माहिती समजताच पोलीस स्टेशन मुक्रमाबाद येथील कर्मचारी स्थळावर दाखल झाले. संपूर्ण रात्रभर मृतदेह शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला परंतु मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडला त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालय मुक्रमाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले शवविच्छेदनानंतर पोलीस स्टेशन मुक्रामाबाद येथे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here