*मुखेड तालुक्यात गटशिक्षणधिकारी शिवभारती साहेब यांचासेवानिवृती समारंभ संपन्न*

0
56

*मुखेड तालुक्यात गटशिक्षणधिकारी शिवभारती साहेब यांचासेवानिवृती समारंभ संपन्न* जाहूर वार्ताहर (मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क)-
४ वर्ष उत्कृष्ट सेवा करुन आपला एक अस्मरणिय ठसा संपुर्ण तालुक्यावर उमटविणारे गटशिक्षणाधीकारी मुखेड
मा.श्री राम शिव भारती साहेब यांची सेवा संपुष्टात आली.सेवानिवृत्त झाल्यानंतर एक आत्मिकजिव्हाळा व प्रेरणादायी स्थान निर्माण करणारे श्रीभारती साहेब व त्यांच्या सुविदयपत्नी सौ.लता भारती
मॕडम यांना आंबुलगा केंद्राच्या वतीने निरोप सन्मानचिन्ह व जोडआहेर शाल श्रीफळ देऊन निरोपसमारंभ करण्यात आला. याच बरोबर त्यांच्या जागेवर उपस्थित झालेले व यापुर्वी सुद्धा याच तालुक्यात भारदस्त प्रशासन चालविलेले जि.प.नांदेड येथे कार्यरत अधिकारी यांना मुखेड तालुका गटशिक्षणाधिकारी हा पदभार मिळालेले मा.श्री संतोषजी शेटकार साहेब
यांचा भव्यसत्कार करण्यात आला.व नुकतच प्रमोशन मिळालेले (शि.वि.अ.मुखेड) श्री माकणे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.आंबुलगा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दासरवार सर यांच्या कल्पकतेतुन केंद्रस्तरीय गुणीजन पुरस्कार इ.सन २०२० चे तिन आदर्शशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक म्हणुन श्री जि.एस.सोमुसे सर (प्रा.शा.किसान तांडा),
श्री आकाश राजुरे सर (प्रा.शा.बिल्लाळी),
श्री डि.व्ही.बिरादार सर
(के.प्रा.शा.आंबुलगा बु.)
वरिल शिक्षकाना योग्य सन्मानचिन्ह व प्रशस्तीपञ देऊन वरिल मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
अशा या ञिवेनीसंगम कार्यक्रमासाठी कार्क्रमाचे अध्यक्ष श्री.शंकरराव पाटील (शा.व्य.समिती) अध्यक्ष हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अवर्जुन उपस्थित असलेले मुखेड पं.समितीचे श्री.बि.एम पाटील साहेब,श्री.जंपलवाड साहेब (शि.वि.अ.पं.स मुखेड) ,श्री विठ्ठलराव वडजे साहेब (केंद्रप्रमुख)गटसाधन देगलुर व विषयतज्ञ कांबळे साहेब,मुंगडे सर,बि.जी.चंदावाड,केंद्रप्रमुख, मोरे सर मु.अ.जाहुर हायस्कुल,आर.व्ही.इंगळे मु.अ.राजुरा बु.,सचिन रामदिनवार शिक्षक सेना तालुका अध्यक्ष मुखेड,गावाचे ,गंगाधर पाटील,पोलीस पाटील कौरवाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत पाटिल ,शिक्षणप्रेमी नागरीक तथा प्रतिष्ठित व्यापारी बाबुसावकार उलीगडे,उपसरपंच विनोद गोविंदवार, कलेटवाड सर,शेषेराव इंगळे,कांबळे सर,झाडेसर,मोतेवार सर ,लोकमत पञकार बालाजी शिंदे उंद्रिकर,मनोज बिरादार,विठ्ठल कल्याणपाड , पवन जगडमवार आणि अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुंदर व सुमधुर वाणीने सुञसंचलन बिल्लाळी शाळेचे मु.आ.शिरंजिपालवार सर यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नृत्यासह बिल्लाळी शाळेचे विद्यार्थी कु.मयुरी घाटे ,सोनाक्षी इंगळे व आकांक्षा कदम यांनी सुंदर हवाभावनृत्यासह मान्यवरांची मने जिंकुन घेतली.भारती साहेबांनी त्यांच्या प्रेरणेने या शाळेतील अनाथ विद्यार्थ्याला ११०० रुपये भेटदिली.साहेबांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. अशा या रंगतदार कार्यक्रमात श्री माकणे साहेब,श्री शेटकार साहेब व शेवटी श्री राम शिव भारतीसाहेबाचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार श्री जवळदापके सर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वि संपन्न होण्यासाठी संकुलपती श्री सुर्यकांत दासरवार सर,केंद्रीय मु.अ.श्री साईबाबा नल्लामडगे सर,अंतर्गत शाळेचे सर्व मु.अ.व सहशिक्षक तसेच संस्थेचे मु.अ.व सहशिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन अतिशय सुंदर कार्यक्रम घडवुन आला.

Previous article*देगलूर तालुक्यात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी*
Next article*बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांचे निधन महाराष्ट्रावर शोककळा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here