माजी सैनिक, विधवांकरिता मालमत्ता कर माफीसाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना – दादा भुसे

0
57

माजी सैनिक, विधवांकरिता मालमत्ता कर माफीसाठी
मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना – दादा भुसे

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.३० – राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा करमाफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे.

मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून यामुळे नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळेल.

सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यासंदर्भात मी पुढाकार घेत मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, नगरविकास मंत्री मा. एकनाथजी शिंदे, ग्रामविकास मंत्री मा. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता असे दादा भुसे म्हणाले.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री यांचे सहर्ष आभार !
यावेळी माझी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

Previous article🛑 मराठा आरक्षणाच्या विलंबामुळे ११ वीच्या विद्यार्थीचे प्रवेश रखडले 🛑
Next articleउस्मानाबाद_ मला तुमची मुलगी आवडते माझ तिच्या शी लग्न लावुन द्या.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here