🛑 मराठा आरक्षणाच्या विलंबामुळे ११ वीच्या विद्यार्थीचे प्रवेश रखडले 🛑

0
42

🛑 मराठा आरक्षणाच्या विलंबामुळे ११ वीच्या विद्यार्थीचे प्रवेश रखडले 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ मराठा आरक्षण प्रकरणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही, याचा परिणाम आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर होताना दिसतो आहे.

१० सप्टेंबरला जाहीर होणारी दुसरी मेरिट लिस्ट आता कधी जाहीर होणार, याचा अंदाज ना शिक्षकांना आहे ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना.
सरकारी पातळीवरुन याबाबत निर्णय होत नसल्याने, ११ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

अकरावीचे प्रवेश लांबणीवर पडल्याने त्याचा परिणाम पहिल्या सत्रावर होणार आहे.

महाराष्ट्र जूनियर कॉलेज शिक्षक असोसिएशनचे प्रो. मुकुंद आंधळे यांचे म्हणणे आहे की, सरकार प्रवेशाबाबत निर्णय कधी घेणार हे माहित नाही, पहिले सत्र तर हातातून गेल्यासारखेच आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली तरी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीत विद्यार्थ्यांचा होणारा अभ्यास हा पुढील शिक्षणाचा पाया मानला जातो. मात्र यंदा हा पायच डळमळीत राहण्याची शक्यता आहे. प्राथमिक शाळेतील मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु झाले तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होईल, याचा अंदाजही अद्याप कुणालाच नाही.

मराठा आरक्षणाबाबत अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय आलेला नाही, शिक्षण विभआगाचीतयारी पूर्म झालेली असून, सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेशी संबंधित असलेलेया एका अधिकाऱ्याने सांगितले आहे…⭕

Previous article🛑 दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी🛑
Next articleमाजी सैनिक, विधवांकरिता मालमत्ता कर माफीसाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना – दादा भुसे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here