🛑 शिवसैनिकांनो तयार रहा…! राज्यात एकहाती भगवा फडकवायचाय :- उद्धव ठाकरे 🛑

0
39

🛑 शिवसैनिकांनो तयार रहा…! राज्यात एकहाती भगवा फडकवायचाय :- उद्धव ठाकरे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई -:⭕ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे चित्र आहे.

राज्यातील सत्ता तीन पक्षांच्या महाविकास आघाडीकडे असली तरी, शिवसैनिकांनो तयार रहा, राज्यात एकहाती भगवा फडकवण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. ही चर्चा साधारण मध्यरात्री पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या चर्चेत ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकवणार असून, त्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे असे म्हटले आहे.

ठाकरे यांनी एकहाती भगवा फडकवण्याची भाषा ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला कितपत रुचेल याबाबत चर्चांना उधान आले आहे….⭕

Previous article🛑 शिवसेनेचा भगवा फडकवा….! हे ३० वर्षापासून ऐकतोय :- शरद पवार 🛑
Next article🛑 ” बिग बॉस सीझन १४ वादाच्या भोवर्‍यात…! मराठी भाषेवर केले विधान :- मनसेचा पलटवार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here