🛑 *अंतिम अहवाल देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ* 🛑

0
42

🛑 *अंतिम अहवाल देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम न्यायवैद्यक अहवाल दाखल करण्यास पोलिस मुद्दाम उशीर करत करत आहेत. हा अहवाल सादर केल्यास त्यातून काही साध्य होणार नाही, अशी भिती पोलिसांना वाटत असल्याचा आरोप डीएसके यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे.

डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील न्यायवैद्यक अहवाल मागील आठवड्यात 23 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सादर करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयात दिले होते.

मात्र हा न्यायालयात पोलिसांकडून सादर करण्यात आला नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणीच्या वेळी दोन नोव्हेंबर रोजी हा न्यायालयात सादर करावा, असे निर्देश न्यायालयाते दिले असल्याची माहिती डीएसके यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये, आशिष पाटणकर यांनी दिली. आयकर अपीलिय प्राधिकरणाने 2015 साली दिलेल्या निकालानुसार, डीएसके ड्रीम सिटीच्या फुरसुंगी येथील जमिनीबाबत गैरव्यवहार झालेला नाही. तसेच त्याबाबत झालेले करारही बरोबर होते.

डीएसके यांनी ठेवीदारांचा पैसा वापरला नाही. त्यामुळे या अहवालामधून काहीच साध्य होणार नाही, अशी भीती तपास यंत्रणेला आहे….⭕

Previous article🛑 *दिवसभरात ४१० जण कोरोनामुक्त* 🛑
Next article🛑 *नोव्हेंबरपासून विविध मार्गांवर एक हजार बस* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here