🛑 *पुणे. पंतप्रधान आवास योजनेच्या २ हजार ९१९ घरकुलांची ऑनलाईन पद्धतीने सोडत!* 🛑

0
47

🛑 *पुणे. पंतप्रधान आवास योजनेच्या २ हजार ९१९ घरकुलांची ऑनलाईन पद्धतीने सोडत!* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आपल्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच प्रकल्पांसाठीच्या २ हजार ९१९ घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीने सोडत आज केंद्रीयमंत्री मा. श्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. पुणे महापालिकेने या योजनेला चांगली गती दिली असल्याचे सांगत प्रधानमंत्री आवास योजनेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी माननीय प्रकाशजींनी सांगितले.

महापालिकेच्या नव्या इमारतीत छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर (ऑनलाईन), विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (ऑनलाईन), भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार श्री. चंद्रकांत पाटील, खासदार श्री. गिरीश बापट, उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, तसेच इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते….⭕

महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेच्या अंतर्गत गरिबांना परवडणारे घरांची योजना वेगवेगळ्या टप्प्यावरती सुरू आहे. पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे, जिथे प्रधानमंत्री आवास योजनेला चांगली गती देत एकूण २९१९ घराची सोडत केली, याचा मला विशेष आनंद आहे.

आपली पुणे महानगरपालिका, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मदतीने भविष्यात १ लाख २५ हजार घरे तयार करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे, त्यात महापालिका, पीपीई, बांधकाम व्यावसायिक यांच्या सहकार्यातून उभारणार आहे. महानगरपालिका गरिबांना परवडणारी ३०० स्के. फुटची घरे देणार आहे, यामध्ये केंद्रसरकार १.५ लाख, राज्यसरकार १ लाख तर महापालिका प्रत्येक घरासाठी लागणार्‍या ३ ते ४ लाख रुपयांची जमिनीच्या किंमतीचा वाटा उचलणार आहे.

सद्य परिस्थितीत हडपसर, खराडी, वडगाव या ठिकाणी एकूण ६,२४५ घरांची कामे सुरू केली आहेत. पुढे EWS, SDH च्या माध्यमातुन शहरातील जागा ताब्यात घेणे तसेच राज्यसरकारकडे शहरातील गायरान उपलब्ध करून देण्यात यावीत, यासंदर्भात मागणी केली आहे.

या प्रकल्पासाठी जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ यामध्ये अर्ज मागविण्यात आले होते. यात १ लाख १३ हजार २०० अर्ज प्राप्त झाले होते, त्यामधील ३८ हजार ८१३ अर्ज हे निकषाप्रमाणे पात्र ठरले होते. ६ हजार २४५ घरकुलांपैकी आज पहिल्या टप्प्यात २ हजार ९१९ घरकुलांची ऑनलाईन सोडत आज पार पडली. पुणे महापालिकेतील शहर अभियंता व त्याच्या टीमचे विशेष कौतुक.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती लावत या योजनेस शुभेच्छा दिल्या….⭕

Previous articleतिसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरा
Next article🛑 ही गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना मिळणार नाही सिलेंडर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here