🛑 IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी 🛑

0
52

🛑 IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 25 ऑक्टोबर : ⭕ इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शनने (IBPS)IBPS Clerk 2020 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आयबीपीएस क्‍लर्क भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. या प्रक्रियेतून (IBPS Clerk application process) IBPS 2557 रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी हजर राहावं लागणार आहे. तसंच योग्य कटऑफ मिळवणाऱ्या उमदवारांना पात्र ठरवलं जाणार असल्याचं, नोटिफिकेशनमधून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी IBPS ने 1557 जागांसाठी अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पदांमध्ये वाढ केली असून आता 2557 पदांसाठी भरती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

IBPS Clerk 2020 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

उमेदवार, सरकारी मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणं आवश्यक आहे. ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्या उमेदवाराकडे त्या राज्यातील प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे.

या भरती प्रक्रियेद्ववारे, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), यूको बँक (UCO Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), इंडियन बँक (Indian Bank), पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) मध्ये क्लर्क पदांसाठी नियुक्त केली जाईल.⭕

Previous articleआज उंद्री प. दे. येथे ६४व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…
Next article🛑 राज्यातील कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेल्या टोळीला हरियाणात जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here