🛑 *पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीला मारहाण करुन गर्भपात केल्याचा आरोप…! गुन्हा दाखल* 🛑

0
61

🛑 *पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीला मारहाण करुन गर्भपात केल्याचा आरोप…! गुन्हा दाखल* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोल्डमॅन सनीसह त्याच्या कुटुंबातील इतर चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सनी नाना वाघचौरे (३१) आशा नाना वाघचौरे (५६), नाना वाघचौरे (६०), नीता गायकवाड (३६) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र असून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी पत्नीला मारहाण करून, शिवीगाळ करत गर्भपाताची औषधे देऊन गर्भपात केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या आई-वडिलांकडे गृहउपोयोगी वस्तूची मागणी वाघचौरे याने केली होती.

दरम्यान, बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन फिर्यादीस मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचे औषध देऊन गर्भपात केला, असं फिर्यादीत पीडित पत्नीने म्हटले आहे.

पती सनी, सासरे, सासू आणि नणंद यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचं पोलीस तक्रारीत फिर्यादीने म्हटलं आहे. या घटनेप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत…⭕

Previous article*जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने* *धरणे आंदोलन करण्याचा इशारा*
Next article🛑 *शहरात स्वच्छतागृहाची वानवा* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here