🛑 राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी १० हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे 🛑

0
34

🛑 राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी १० हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधकांनीही गेल्या काही दिवसांत बांधावर जाऊन शेतकऱ्यांची ही परिस्थिती जाणून घेतली.

ही परिस्थिती गंभीर असल्याचं सर्वांनीच मान्य केलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दोन दिवसांत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं होतं.

त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्यात १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘परिस्थिती कठीण आहे. राज्य सरकारपुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत.

केंद्र सरकारकडून येणे असलेले ३८ हजार कोटी अजूनही मिळालेले नाहीत. अद्यापही पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे.

त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. पण राज्य सरकार शेतकऱ्यांवर संकट येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे.

सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं….⭕

Previous article*मेशी गावात एकाच कुटूंबातील सात जण कोरोनाबाधित गावात चिंता वाढली*
Next article🛑 राणीबागेतील फांद्याची छाटणी …! पावणे दोन कोटींच्या कंत्राटाची वाटणी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here