🛑 एकनाथ खडसे यांचा….! शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश 🛑

0
47

🛑 एकनाथ खडसे यांचा….! शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडत असून खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरुवातीला केला गेला.

जयंत पाटलांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावरून जुन्या आठवणी सांगतानाच भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे जाहीर केल्यापासून त्यांना कोणतं महत्वाचं मंत्रिपद किंवा जबाबदारी मिळणार यावरून चर्चा रंगल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण अथवा शिवसेनेकडे असलेलं कृषी खातं देण्यावरून तडजोड केली जात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘खडसेंनी कोणत्याही पदासाठी पक्षात प्रवेश केला नसून त्यांनी पक्षात येताना काहीही मागितलेला नाही आणि आमच्यातही अजून तशी चर्चा झालेलं नसल्याचं सांगून अशा चर्चांना खतपाणी घालू नका असं आवाहन देखील केलं आहे.

एकनाथ खडसेंवर भाजपने अन्याय केला असून कटकारस्थानं रचली गेली. खडसेंच्या अन्यायाबाबत सर्वाधिक मीच बोललो असेन. मी सभागृहात प्रश्न विचारला होता, कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर आजही मिळालं नाही, पण त्यांना (भाजपला) आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है’ असा टोला जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे…⭕

Previous articleबेरळी येथील लाळ्या खुरकूत रोगाची लस व आधार बिल्ले मारणे संपन्न
Next articleसोनी_मराठी TV चॅनल वरील सावित्री ज्योती या मालीके मधील चमत्कार दाखवनारा प्रकार थांबवावा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here