🛑 जयंत पाटलांचा दावा…! खडसेनंतर डझनभर भाजप आमदार, राष्ट्रवादीच्या वाटेवर 🛑

0
48

🛑 जयंत पाटलांचा दावा…! खडसेनंतर डझनभर भाजप आमदार, राष्ट्रवादीच्या वाटेवर 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई -⭕उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा बसला असून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

त्यावर अखेर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पक्षावर मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पण त्यांच्यासोबतच भाजपचे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पाटील म्हणाले, बऱ्याच जणांनी खासगीत खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे.

खडसेंचे नेतृत्व जे मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही, असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील.

तसेच कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणे परवडणार नसल्यामुळे डझनभर आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत….⭕

Previous article🛑वरवंटे,खलबते विकुन झाली पीएसआय🛑
Next article🛑 *पाठी मागून धूर निघतोय सांगितल्यावर थांबली नॅनो कार, काही कळायच्या आता..* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here