*एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ कन्या रोहिणी खडसेंची राजीनाम्याची घोषणा*

0
47

*एकनाथ खडसेंच्या पाठोपाठ कन्या रोहिणी खडसेंची राजीनाम्याची घोषणा*

*युवा मराठा न्युज*

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ , निष्ठांवत नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रावादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही भाजपचा राजीनामा
देण्याची घोषणा केली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतर निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. या प्रकरणाची तक्रार पुराव्यासहित करण्यात आली
होती. मात्र, भाजपश्रेष्ठींनी याची कोणतीही दखल घेतली नाही. मी देखील आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे काम करणार आहे, असी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
ज्या व्यक्तीनं ४० वर्ष पक्षनिष्ठेनं काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दु:ख होणं स्वाभाविक आहे. नाथाभाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच चार वर्षांपासून मी तणावाखाली होतो. फडणवीसांनी माझं आयुष्य उध्वस्त केलं आहे. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी .*

Previous articleभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार – जयंत पाटील
Next articleदहिवड रामनगर परिसरात भवरी मळा येथे बिबट्याचे आगमन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here