*श्री महालक्ष्मी देवीस २१ किलो चांदीचे प्रभावळी (मखर) , नवरात्रोत्सवातील आरतीचे थेट प्रेक्षपण*

0
49

*श्री महालक्ष्मी देवीस २१ किलो चांदीचे प्रभावळी (मखर) , नवरात्रोत्सवातील आरतीचे थेट प्रेक्षपण*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीस कल्याणी सखीमंच आणि विजयसिंह यादव प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.विद्याताई पोळ विद्यमान नगरसेविका आणि विजयादेवी यादव माजी.प्रथम महिला नगराध्यक्षा यांच्यावतीने महालक्ष्मी देवीस एकवीस किलो चांदीचे प्रभावळी(मखर) अर्पण करण्यात आले आहे.तसेच मंदिराच्या गाभाऱ्यातील चौकटही चांदीची बसवण्यात आली आहे .
आणि लोकसहभागातून महालक्ष्मी देवीची संपूर्ण पालखी चांदीची करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवातील दररोज होणाऱ्या आरतीचे सर्व भक्तांना थेट प्रेक्षपण आत घरी बसुन पहायला मिळत आहे. तसेच श्री.महालक्ष्मी देवस्थान समिती वडगांव यांच्यावतीने वडगांव व भागातील सर्व भक्तासांठी दरोरज होणाऱ्या सर्व आरतीचे थेट प्रेक्षपण यु ट्यूब चँनेल च्या माध्यमातून एच.डी.
लाइव्ह प्रेक्षपित करण्यात आले आहे.
याचा लाभ पहाटे ५-३० , सकाळी ११-०० व रात्री ९-०० वाजता आरतीचे थेट प्रेक्षपण सर्व भक्तानी घेण्याचे आवाहन महालक्ष्मी देवस्थान समितीच्या वतीने केले आहे.
मंदीर बंद असलेने पहाटेच्या आरतीला भक्तांची गर्दी होत असलेने मंदीरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शारदीयनवरात्र उत्सवातील आज
तिसरा दिवस आजच्या पूजेचे
मानकरी श्री राहूल उर्फ बाळकृष्ण राजाराम पाटील (न्यायाधीश ) वडगांव आहेत.
आजची पूजा श्रीपूजक नंदू गुरव आणि संतोष गुरव यांनी बांधली आहे.

मोहन शिंदे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 9850327474.

Previous article*व-हाणेत ग्रामपंचायतीचा कारभार,* *गोंधळात गोंधळ सावळागोंधळ!!*
Next articleसंघर्षाच्या काटेरी वाटेवरील प्रवासी, राजेंद्र पाटील राऊत एक अवलिया!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here