*व-हाणेत ग्रामपंचायतीचा कारभार,* *गोंधळात गोंधळ सावळागोंधळ!!*

0
55

*व-हाणेत ग्रामपंचायतीचा कारभार,*
*गोंधळात गोंधळ सावळागोंधळ!!* मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पत्रकार भवनच्या जागेवरुन सध्या बहुचर्चित असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.
सध्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या विकासकामांसोबतच विविध प्रकारची चौकशी सुरु आहे.सोमवार दिनांक १२आँक्टोबर २०२० रोजी व-हाणे गांवी ग्रामपंचायत दप्तराच्या चौकशीकामी चौकशीअधिकारी राजबन्शी यांनी भेट दिली असता,तेथील ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दप्तर उपलब्ध करुन दिले नाही.व दप्तर अर्धवट असून घरी ठेवल्याचे सांगितले,त्यामुळे पंचायत समिती मालेगांव कडून ग्रामसेविका सांळुखे यांना नोटीस बजावण्यात येऊन चार दिवसात दप्तर चौकशीकामी हजर करण्याचे नोटीशीव्दारे बजावण्यात आली असले,तरी यानिमिताने अनेक गंभीर प्रश्न यानिमिताने उपस्थित होत आहेत.ग्रामपंचायतीचे शासकीय दप्तर घरी घेऊन जाण्याचा नैतिक अधिकार ग्रामसेवकांना आहे का? त्याशिवाय अर्धवट असलेल्या दप्तरात नंतर काही अफरातफर करुन ते दप्तर पुर्ण असल्याचे दाखविले गेले तर ती जबाबदारी नेमकी कोणाची?कामात सातत्याने निष्काळजीपणा करुन ,शासकीय दप्तराच्या बाबतीत जागरुक न राहता दप्तरदिरंगाई कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या ग्रामसेविका सांळुखे यांच्यावर आता प्रशासन नेमकी काय कारवाई करते याबाबत जनतेमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

Previous article🛑 *गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू :- संभाजीराजेंचे मोठे विधान* 🛑
Next article*श्री महालक्ष्मी देवीस २१ किलो चांदीचे प्रभावळी (मखर) , नवरात्रोत्सवातील आरतीचे थेट प्रेक्षपण*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here