🛑 पुण्यातील बुधवार पेठेचा इतिहास -: शंतनू परांजपे 🛑

0
66

🛑 पुण्यातील बुधवार पेठेचा इतिहास -: शंतनू परांजपे 🛑

✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) 

 

सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते.

 

पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.

 

पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.

 

सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३० वर्षे हे मंदिर बांधायला लागली. सन १७६१ मध्ये नारो अप्पाजी खिरे यांनी या मंदिराच्या पायाची उभारणी केली. पुढे हेच घराणे तुळशीबागवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार खासगीवाले यांच्याकडे कारकून पदावर असणाऱ्या खिरे याना नानासाहेब पेशव्यानी सुभेदारी दिली होती. नारो अप्पाजी हे आपल्या कारभारात अत्यंत कुशल होते व आपल्या कारकिर्दीत त्यांच्यावर एकदाही गैरव्यवहाराचा ठपका बसला नाही.

 

त्या काळी खासगीवाले यांची बाग ही पुण्याची सीमा होती. सध्या दिसत असणारी मंडई या भागात खासगीवाल्यांची मोठी बाग होती, तुळशीबागवाले यांनी खासगीवाले यांच्याकडून एक एकराची बाग विकत घेतली आणि तिथे अनेक देवालायांचा परिसर उभा केला.

 

दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बांधण्यात आलेला बुधवार वाडा हा सध्याच्या बुधवार चौकात होता, पुण्याते विश्रामबागवाडा, बुधवारवाडा आणि शुक्रवारवाडा असे तीन वाडे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात बांधण्यात आले. पैकी बुधवार वाड्यात कचेरीचे काम प्रामुख्याने होते असे. हा वाडा सन १८७९ मध्ये लागलेल्या आगीत जाळून खाक झाला.

 

बुधवार पेठ ही शनिवार पेठेला लागून असल्याने पेशव्यांच्या काळात येथे बरीच वस्ती झाली होती. तसेच मोठ्या मोठ्या सरदारांच्या असणाऱ्या बागा यामुळे या पेठेला बरेच महत्व होते. अनेक मंदिरे, भव्य बागा, पेशव्यांचा वाद, कोतवाल चावडी यांमुळे ही पेठ तेव्हाही प्रसिद्ध होतीच तसेच आजही तुळशीबाग, दगडूशेठ मंदिर, भाजी मंडई यासारख्या परिसरामुळे या पेठेचा परिसर हा अगदी गजबजून गेलेला असतो.

 

फोटो –

१. तुळशीबाग राम मंदिराचा कळस

२. तुळशीबाग राम मंदिराचा तत्कालीन फोटो – सिद्धार्थ जोशी

३. नव्या मंडईचे एक रेखाचित्र…⭕

Previous article*करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी* *शारदीय नवरात्रोत्सव*
Next article✍️ पुणे :( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here