कांदा दराची झेप ! उन्हाळ कांदा सात हजारावर ; तर लाल कांदा चार हजार रुपये प्रतिक्विंटल

0
46

कांदा दराची झेप ! उन्हाळ कांदा सात हजारावर ; तर लाल कांदा चार हजार रुपये प्रतिक्विंटल

प्रतिनिधी= किरण अहिरराव

नाशिक : (पिंपळगाव बसवंत)केंद्र शासनाने निर्यातबंदीचा खटाटोप करून व व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकूनही कांद्याच्या दराची उसळी थांबलेली नाही. वर्षभरानंतर उन्हाळ कांद्याला शनिवारी (ता.१७) सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळाला. नव्याने दाखल झालेल्या लाल कांद्याचे स्वागत चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने झाले आहे.

महिन्यापासून कांद्याला रोज उच्चांकी दर

परतीच्या पावसाने लाल कांद्याची नासाडी केली व पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने दराला झळाळी आली आहे. सहा महिन्यांपासून कांद्याचे दर रोडावलेले राहिले. अगदी आठ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कांदा विकावा लागला.
पण महिन्यापासून कांद्याला रोज उच्चांकी दर मिळत आहेत. आज तर कांद्याने वर्षभरापूर्वी मिळालेल्या सात हजार रुपयांचा भाव खाल्ला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत बेंगळुरू, धुळे, पुणे येथे बाजारात येणारा कांदा पावसाने सडला. लाल कांद्याची अत्यल्प आवक होत असल्याने सर्व मदार उन्हाळ कांद्यावर आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, तर लाल कांदा येण्यास अधिक विलंब होईल व बाजारभाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज कांदा व्यापारी अतुल शाह यांनी व्यक्त केला

पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी (ता.१७) दिवसभरात कांदा खरेदी विक्रीतून दोन कोटी ६५ लाखांची उलाढाल झाली. लाल व उन्हाळ कांद्याचे दर तेजीत असल्याने अवघी साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक होऊनही अडीच कोटी रुपयांहून अधिक अर्थकारण झाले.

Previous articleदेवळा तालुक्यात गायी बैलांच्या चोऱ्या वाढल्या,शेतकरी त्रस्त!
Next article*भगर खाल्याने ७/८ महिलाना विषबाधा,३ महिला आय सी यु मध्ये दाखल, राहुरी फॅक्टरी येथील दुकानदाराचा महाप्रताप!*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here