🛑 *काळकाई देवी मंदिर..! खेड भरणे नाका* 🛑

0
479

🛑 *काळकाई देवी मंदिर..! खेड भरणे नाका* 🛑
✍️रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:⭕ तालुक्यातील भरणेनाका येथे शेकडो वर्षापूर्वी एक घनदाट जंगल होते. आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे चरण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत.

या गुरांच्या कळपात एक गाय होती. ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावर दुधाचा पान्हा सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे. हा प्रकार होत असताना गुराखी जवळपास नसत. मात्र, एक दिवस गुराख्याने हा प्रकार पाहिला. लागलीच घडला प्रकार त्या गुराख्याने गावातील सर्व ग्रामस्थांना सांगितला.

गुराख्याच्या माहितीवरून ग्रामस्थांनी पाहणी केला असता याठिकाणी दैवी वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला. या पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली. हा विचार सुरू असतानाच एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दिलेल्या दृष्टांतात एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना केली आणि त्या ग्रामस्थाने देवीचे मंदिर उभारले, अशी या भरणे येथील श्रीकाळकाई देवीची आख्यायिका आहे.

काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्रीकाळकाई असल्याचे जाणकार सांगतात.

पुराणातील कथांमध्ये खेडजाई, रेडजाई, पाथरजाई, वरदायिनी व काळकाई या पाच बहिणी होत्या, असा उल्लेख आहे. त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये या चार देवींची मंदिरे मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात.

दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले.
१७ ऑक्टोबर २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

या जीर्णोद्धारासाठी मंदिर कार्यकारिणी देखील स्थापन करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २००२ मध्ये संस्था नोंदणी करण्यात आली. यावेळीच मंदिराच्या पुनर्जीर्णोद्धारासाठी कंबर कसण्यात आली.
४ मे २०१० ला मंदिरावर सुवर्ण कलशारोहण देखील करण्यात आले आहे. या सुवर्ण कलशारोहण समारंभात हजारो भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी मनोभावे अर्पण केलेल्या देणगीच्या रकमेतून हा सोहळा पार पडला. भरणेनाका येथे उतरून मंदिराकडे पायी चालत जाता येते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाक्याजवळच श्री काळकाईचे देखणे मंदिर आहे..
कोकण श्रद्धाळू लोकांचा प्रांत मानला जातो.

याचे प्रत्यंतर देणारे मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील श्रीकाळकाई देवीचे मंदिर.
काळधर्म निवारणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून, महामार्गावरून येणारे-जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करीत नाहीत.
महामार्गावरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व काळकाई देवीचे मंदिर यामुळे भरणे प्रवाशांच्या चटकन नजरेस पडते.

ही देवी नवसाला पावते, अशी भावाना जिल्हयातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची बनली आहे. आईचा नवरात्र उत्सव…⭕

Previous article🛑 मुसळधार पावसामुळे कोथरूड भागा मधे पाणी साचले 🛑
Next articleपारोळा शहरातील ब्रम्हमोत्सव रथोत्सव यावर्षी हा ब्रम्होत्सव कोरोना मुळे स्थगित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here