🛑 पाणीच पाणी चोहीकडे…! शहरात नालेसफाईचा बोजवारा 🛑

0
45

🛑 पाणीच पाणी चोहीकडे…! शहरात नालेसफाईचा बोजवारा 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुणे शहरात बुधवारपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महापालिका कितीही नालेसफाईचा दावा करीत असली तरी शहरातील रस्त्यायांना नदीचे स्वरूप आले आहे. या पावसामुळे २५ सप्टेंबरची आठवण झाली. कोथरूड, हडपसर, शहरातील मध्यवर्ती भाग, पेठा, कर्वेनगर – वारजे, शिवणे – उत्तमनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला. नदी – नाले खडखडून वाहत आहे. घाण पाणी रस्त्यावर आल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. आज सकाळपासूनच पुणे महापालिकेच्या सर्वोपक्षीय नगरसेवकांनी पाहणी केली. सहकारनगर, बिबवेवाडी, मंगळवार पेठ, कोथरूड परिसरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजही गायब झाली होती. त्यामुळे काही पुणेकरांना अंधारात राहण्याची वेळ आली. या पावसासंदर्भात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त असे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी सांगितले.

– नालेसफाईचा बोजवारा पृथ्वीराज सुतार, शिवसेना गटनेते
शहरात अचानक झालेल्या या पावसामुळे मागील वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्यात. पुणेकर अक्षरशः घाबरले होते. महापालिका कितीही नालेसफाई झाल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुणेकरांना नाहक त्रास होत आहे. आज सकाळपासूनच नागरिकांचे फोन सुरू होते. त्यामुळे दुपारपर्यंत सोसायट्याची पाहणी केली आहे.

-महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली कोथरूडमध्ये पाहणी
बुधवारी दिवसभर आणि रात्री मुसळधार झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते.

आज सकाळी लवकर कोथरुड येथील नाल्यांच्या परिसरातील भुसार कॉलनी, कुंभरे पार्क या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आढावा घेतला….⭕

Previous articleवारजे कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप
Next article🛑 लाल महल ते लाल किल्ला…! मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडणार :- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here