🛑 राज्यातील पहिले कोरोनामुक्त कोविड सेंटर ठाण्यात 🛑

0
36

🛑 राज्यातील पहिले कोरोनामुक्त कोविड सेंटर ठाण्यात 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे :⭕कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणार्‍या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे उद्घाटन होणार आहे. या पोस्ट कोविड सेंटरमध्ये ये-जा करण्यासाठी ठाणे स्टेशन येथून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ६.३० पासून रात्री १२ पर्यंत दर अर्ध्या तासाने या सेंटरसाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आले आहे.

लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिकेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

या ठिकाणी कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना जाणवणार्‍या अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कोरोनामुक्त रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट यांच्यासह या सेंटरमध्ये योगा सेंटर, विश्रांती कक्ष तसेच समुपदेशन सेंटर अशा सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.⭕

Previous article🛑 घसा खवखवतोय का ? दुर्लक्ष करु नये 🛑
Next articleवारजे कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here