🛑 प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या तरुणाला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आणि अटक 🛑

0
46

🛑 प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या तरुणाला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आणि अटक 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. या तरुणावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनोज क्षीरसागर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत असभ्य भाषेत एका तरुणाने 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
मनोज क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली आहे.

सूरज चव्हाण (वय 34) असं या तरुणाचं नाव आहे. सूरज चव्हाण हा कात्रज इथला रहिवासी आहे. पोलिसांनी सोमवारी उशिरा अटक केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी सूरज चव्हाणावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम आणि भारतीय दंड संहिता संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सूरजला दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायलयाने सूरजला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे…⭕

Previous article🛑 पुण्यातील गुन्हे शाखेचा विस्तार 🛑
Next article🛑 JEE च्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा चुकली असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा संधी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here