🛑 राज्यात आजपासून ग्रंथालये सुरू….! सरकारचे आदेश 🛑

0
63

🛑 राज्यात आजपासून ग्रंथालये सुरू….! सरकारचे आदेश 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्र मिशन बिगन अगेनच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखी एक आनंदाची बातमी नागरिकांसाठी राज्य सरकारने दिली आहे.

राज्यात गुरूवार,आजपासून ग्रंथालये सुरू करण्यात ठाकरे सरकारने परवानगी दिली असून नुकतेच सरकारने यासंबंधीचे नवे आदेश जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान, या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी करत राज यांना निवेदनही दिले होते.

या महिन्यातील १ तारखेपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालये सुरु करण्यासाठी परवानगी दिली असून यासंदर्भात राज्य सरकारकडून नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.⭕

Previous article🛑 *मुहूर्त ठरला ! भाजपाला धक्का बसणार…..! आजी-माजी आमदारांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार* 🛑
Next articleसोयाबीन काढणीला पावसाचा खोडा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here