🛑 Flipkart Big Billion Days: सॅमसंग, ओप्पो, रियलमीच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट 🛑

0
45

🛑 Flipkart Big Billion Days: सॅमसंग, ओप्पो, रियलमीच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 13 ऑक्टोबर : ⭕ देशात फेस्टिव सीजन थोड्याच दिवसांवर आला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट्सने आपल्या वार्षिक सेलची घोषणा केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना खेचण्यासाठी प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर डिस्काउंट देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टने Flipkart Big Billion Days सेल तर अॅमेझॉनने Great Indian Festival सेल ची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट सेलची सुरुवात १६ ऑक्टोबर पासून होणार आहे.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये पोको एम २ आणि एम २ प्रो स्मार्टफोनवर ४००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या दोन्ही फोनला अनुक्रमे १० हजार ४९९ रुपये आणि १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जावू शकते. LG G8X च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९० रुपये असणार आहे. या फोनची खरी किंमत भारतात ७० हजार रुपये आहे. भारतात ७० हजार रुपये किंमतीत हा फोन लाँच करण्यात आला होता. तर रियलमी नार्जो २० प्रो आणि २० ला १४ हजार ९९९ रुपये आणइ १० हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ४१ ला बिग बिलियन डेज सेलमध्ये १५ हजार ४९९ रुपये किंमतीत पहिल्यांदा खरेदी करता येवू शकेल. ‘Flipkart Smart Upgrade’ अंतर्गत १० हजार ८५० रुपयांची सूट मिळू शकते. सर्वात मोठी डील गॅलेक्सी एस २० प्लस स्मार्टफोनवर मिळणार आहे. या फोनला ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. या फोनची किंमत ८३ हजार रुपये आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी नोट १० प्लस फोनच्या किंमतीत सुद्धा हा फोन ८५ हजार रुपयांऐवजी ५४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकेल.

ओप्पो ए५२ च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला १७ हजार ९९० रुपयांऐवजी १२ हजार ९९० रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे. तर ओप्पो स्मार्टफोन्स जसे ओप्पो ए५एस, ओप्पो एफ१५, ओप्पो ए३१ आणि रेनो ४ प्रोवर सुद्धा ऑफर्समध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अन्य हँडसेट जसे गुगल पिक्सल ४ ए ला सुद्धा बिग बिलियन सेलमध्ये पहिल्यांदा उपलब्ध करण्यात येणार आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. गेमिंग कन्सोलचा लेटेस्ट एक्सबॉक्स सीरीज एस सुद्धा या सेलमध्ये सूट सोबत उपलब्ध करण्यात येणार आहे. Xbox Series S ला २९ हजार रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर पासून हा ३४ हजार ९९० रुपयांत विकला जाणार आहे.⭕

Previous article🛑 डोंगरी कोळीभगिनींनी परप्रांतीय मांसेविक्री करणार्‍या विरोधात घेतली राज ठाकरे यांची भेट 🛑
Next article🛑 खुशखबर! मुंबईत नोकऱ्यांचे प्रमाण वाढले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here