*भरमसाठ व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याने तरूणावर खूनी हल्ला*

0
39

*भरमसाठ व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याने तरूणावर खूनी हल्ला*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

करवीर तालुक्याच्या पाचगावमधे
सावकारीतून घेतलेल्या कर्जासह भरमसाठ व्याजाची रक्‍कम देण्यास नकार दिल्याने संतप्‍त झालेल्या सावकाराने साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात संतोष रमेश वाघमारे (वय 34, रा. गुलमोहर कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) जखमी झाले. डोक्यात सोड्याची बाटली फोडल्याने वाघमारे यांची प्रकृती गंभीर बनली आहे. अतिदक्षता विभागात जखमीवर उपचार सुरू आहेत.
संशयित महेश दत्तात्रय भोळे (30, रा. महादेव गल्‍ली, पाचगाव), रणजित विजय भोपळे (36, साने गुरूजी वसाहत) या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. संतोष वाघमारे यांनी सावकार महेश भोळे याच्याकडून चार वर्षांपूर्वी 1 लाख रुपये कर्ज घेतले होते.
वेळोवेळी त्यांनी 1 लाख 80 हजार रुपयांची परतफेड केली. सावकाराने आणखी 5 लाखांसाठी वाघमारेकडे तगादा लावला होता. वसुलीसाठी दहशत माजविणार्‍या सावकारासह साथीदाराला वाघमारे यांनी उर्वरित रक्‍कम देण्यास नकार दिला होता.
गुरुवारी रात्री संतोष वाघमारे हा मित्र गोकुळ सुतार याच्याशी रस्त्याकडेला बोलत थांबलेला असतानाच संशयित तेथे आले. सावकारीतील पैशावरून त्यांच्यात वादावादी झाली. व्याजाचे पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्‍त झालेल्या भोळेने रणजित भोपळे याच्या मदतीने हत्यार्‍याने वाघमारेवर हल्‍ला केला. शिवाय डोक्यात सोड्याची काचेची बाटली फोडली. या हल्‍लामुळे प्रकृती गंभीर बनल्याने वाघमारे यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

Previous article*मराठा आरक्षणावर राजकारण न कराता तोडागा काढण्याची गरज,*
Next article*महिला अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here