🛑 एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; मराठा उमेदवारांना दिलासा 🛑

0
43

🛑 एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; मराठा उमेदवारांना दिलासा 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 10 ऑक्टोबर : ⭕ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) येत्या रविवारी ११ ऑक्टोबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली.

मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. खासदार संभाजी राजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. एकूण सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारवर ही परीक्षा न घेण्यासाठी दबाव निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यात ही परीक्षा तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘करोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं, अजूनही ते दूर झालेलं नाही. करोनाकाळात अभ्यासिका बंद होत्या, अनेक विद्यार्थ्यांचीही मागणी होती की ही परीक्षा पुढे ढकलली जावी, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली, ही परीक्षा आता कधी होणार त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.’

मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला होता. खासदार उदयनराजे यांनीही आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यायला नको अशी भूमिका मांडली होती. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मराठा समाजासह अन्य समाजाचेही उमेदवार असतात, असे भुजबळ म्हणाले होते.

यापूर्वी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.⭕

Previous article🛑बापूचा मोर्चा, जिल्ह्यात चर्चा🛑
Next article*एम.पी.एस.सी.परीक्षा रद्द झाल्याने* *कोल्हापूरात मराठा समाजाच्याने* *वतीने स्वागत*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here