*कौळाणे-व-हाणे ग्रामपंचायतीकडून फसवणूक प्रकरणी चौकशी सुरु!*

0
47

*कौळाणे-व-हाणे ग्रामपंचायतीकडून फसवणूक प्रकरणी चौकशी सुरु!*
*उपोषण आंदोलन तुर्तास स्थगित*
*मालेगांव,दिपक भावसार-* सध्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निं) आणि व-हाणे ग्रामपंचायतीकडून पत्रकार भवनच्या नावाखाली झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणात मालेगांव तालुका पंचायत समितीकडून चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी हे कसून चौकशी करीत आहेत.त्यामुळे दिनांक १२आँक्टोबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणारे आमरण उपोषण आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली. यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी राजेंद्र पाटील राऊत यांना आज एक पत्र देऊन,आपण कृपया उपोषण करु नये अशी विनंती करण्याबरोबरच या पत्रातून कळविण्यात आले आहे की,शीघ्रगतीने होत असलेल्या या चौकशीचा अहवाल आपणांस तात्काळ उपलब्ध करुन दिला जाईल व योग्य ती कार्यवाही संबधिताविरुध्द करण्यात येईल अशा आशयाचे पत्र देण्यात आल्याने सदरचे उपोषण आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. *मात्र तरीही लढा सुरुच राहणार* पंचायत समितीकडून आपणांस चौकशी अहवाल प्राप्त झाला तरी आपला या प्रश्नावरील लढा हा सुरुच राहणार असल्याची माहिती राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण हे प्रकरण थेट महारष्ट्राचे लोकआयुक्त व राज्यपाल यांचेकडे दाखल करणार असून न्यायाची मागणी केली जाणार आहे,त्याशिवाय कौळाणे (निं.) गावी सन २०१८ साली पत्रकार भवनला दिलेली जागा जुलै २०२० पर्यत कागदोपत्री कायम असताना,अचानक ती नामंजूर रद्द करण्याचा नैतिक अधिकार ग्रामसेवक दिनेश जाधव व प्रशासक सुनील बच्छाव यांच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व पदावर नसलेल्या सरपंच सौ,लताबाई बच्छाव यांना नेमका दिला कुणी? की,यातही काही काळेबेरे दडलेले आहे,कुणाच्या संगनमताने हे कुटील कारस्थान करण्यात आले.याचीही खरे तर निपक्षपातीप्रमाणे चौकशी होऊन सरपंचाच्या कार्यकाळातील सगळ्यांच्या विकासकामांची कसून चौकशी करण्यात येऊन दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवा मराठा न्युजने केलेली आहे.तर व-हाणे गांवी मोठा गाजावाजा करुन सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन करुन सदर ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा पत्रकार निवासस्थानाला देण्याचे मान्य करुनही व पाणपोईचे स्वतःच्या हाताने उदघाटन करणाऱ्या ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी नंतर घुमजाव करुन आपला शब्द फिरविला.व सदर जागेबाबत राजकारण सुरु केले.त्यामुळे त्या प्रकरणाची देखील कसून चौकशी होणे क्रमप्राप्त ठरते.त्याशिवाय शासनाच्या पत्रकार निवासस्थानाविषयी असलेल्या परिपत्रकाशी किंवा गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना याप्रश्नी तात्काळ कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र देऊनही त्यालाच जर महत्त्व दिले जात नसेल तर कर्मचारी नेमके कुणाच्या आशिर्वादाने असे बिनधास्तपणे वागण्याचे धाडस करुन सामान्य जनतेची फसवणूक करण्याबरोबरच त्यांना वेठीस धरतात याचाही खरे तर आता वरिष्ठ पातळीवरुन अधिकाऱ्यांनी शोध आणि बोध घ्यावा.तुर्तास एवढेच! (क्रमशः -उद्या पुन्हा भेटूया याच जागी…आणि उद्या रात्री अवश्य बघा ८ वाजता फेसबुक लाईव्हवर कैफीयत जनतेच्या दरबारात)

Previous articleभऊर येथे बिबट्याने केल्या पाच शेळ्या फस्त ; पिंजरा लावण्याची मागणी
Next article*हाथरस प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयचे कळवणला निवेदन सादर*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here