🛑 *ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड* 🛑

0
49

🛑 *ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :-⭕मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असून त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळालं.
अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले.

विशेष म्हणजे केवळ रुपेरी पडदाच नव्हे तर रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली….⭕

Previous article🛑 रेल्वे प्रवाशांसाठी अमेझॉनची गुड न्यूज 🛑
Next article🛑 कोरोना काळातल्या परिस्थितीला कंटाळून नृत्यांगनेनं २१ व्या वर्षीच संपवलं आयुष्य 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here