🛑 सॅमसंग गॅलेक्सी M51 ला स्वस्तात खरेदीची संधी, फोनमध्ये 7000mAh बॅटरी 🛑

0
44

🛑 सॅमसंग गॅलेक्सी M51 ला स्वस्तात खरेदीची संधी, फोनमध्ये 7000mAh बॅटरी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 7 ऑक्टोबर : ⭕ सॅमसंग गॅलेक्सी M51 स्मार्टफोनला मागच्या महिन्यात देशात लाँच केले होते. गॅलेक्सी एम सीरीजच्या या फोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि होल पंच डिस्प्ले दिला आहे. गॅलेक्सी एम ५१ या सीरीजचा पहिला फोन आहे. जो वन यूआय सोबत येतो. जर तुम्हाला मोठी बॅटरी असलेला फोन हवा असेल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. अॅमेझॉनवर या हँडसेटला २ हजारांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एम ५१ च्या ६ जीबी रॅम व्हेरियंटला २४ हजार ९९९ रुपयात तर ८ जीबी रॅम व्हेरियंटला २६ हजार ९९९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. हा फोन अॅमेझॉन वर आता दोन हजारांच्या सूटमध्ये खरेदी करता येवू शकतो. आयसीआयसीआय बँक कार्ड द्वारे फोन खरेदी केल्यास २ हजारांची सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये फोनवर एक हजारांची अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. सॅमसंगचा हा फोन सेलेस्टियल ब्लॅक आणि इलेक्ट्रिक ब्लू कलर मध्ये येतो. नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करता येवू शकतो.

या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनमध्ये दिला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.

फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी IMX682 सेंसर दिला आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला आहे.⭕

Previous article🛑 माझं कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही सगळे मरा….! मी राहतो घरी -: आमदार नितेश राणे 🛑
Next article*युवा मराठा न्युजच्या दणक्यानंतर आज होणार कौळाणे व-हाणे ग्रामपंचायतीची चौकशी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here