🛑 *असल्फा येथून गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या घटनेला नवं वळण* 🛑

0
43

🛑 *असल्फा येथून गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या घटनेला नवं वळण* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शितल भानुशाली ही ३२ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. आज पहाटे ३ वाजता सदर महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्र किनारी आढळला. आता या मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागताना दिसत आहे.

असल्फा ते हाजीअली दरम्यान जवळपास २० ते २२ किमी चे अंतर आहे.

महापालिकेच्या अधिका-यांकडून  मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या लांब अंतरापर्यंत जाणे शक्य नाही असे सांगितले जात आहे. शिवाय, महापालिकेनं  पर्जन्य जल वाहिन्या , गटारे येथुन वाहणा-या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी  जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका येथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम समुद्रकिनारी येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते.

त्यामुळे तब्बल २० ते २२ किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी आजुबाजूचे सिसीटिव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतायेत का हे पाहिले जात आहे. या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.

*दागिन्यांवरुन ओळख *
शीतलच्या घरच्यांना तिचे दागिने आणि कापड्यांवरून ओळख पटली. गटाराचे झाकण पावसाने उघडले असावे आणि त्यातून ही महिला वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
अशाप्रकारे गटारातून वाहून जाऊन अनेक मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे. गटारावर बसवलेली झाकणे ही पाण्याच्या जोराने उघडतात आणि त्यात असा अपघात घडतोय.

शीतल भानुशाली ही असल्फा येथील चाळीत राहत असून दळण आणायला गेली होती त्यानानंतर ती घरीच परतलीच नाही….⭕

Previous article🛑 *६आॅक्टोबर इ.स.१८५८* रोजी ” *क्रांतीवीर नानासाहेब पेशवे “यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन* 🛑
Next article🛑 *पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिली पत्नीच्या खुनाची कबूली*🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here