🛑 दादर मेट्रो स्थानक येथे भुयारीकरणाचा ३२वा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण 🛑

0
38

🛑 दादर मेट्रो स्थानक येथे भुयारीकरणाचा ३२वा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई -:⭕आज १.१० कि.मी. चा भुयारीकरणाचा ३२वा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम.एम.आर.सी.) तर्फे पूर्ण करण्यात आला.

हे भुयारीकरण सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानक इतके आहे . या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता श्री. आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते . ” नागरिकांना कामामुळे होणारा त्रास कसा कमी होईल याचा विचार करून हे महत्वपूर्ण आणि अवघड काम पूर्ण करणं कौतुकास्पद आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार असून हे एक वरदान ठरणार आहे. ” असं श्री. कुंभकोणी म्हणाले.

कृष्णा २ हे हेरेननेच बनावटीचे आणि भूगर्भदाब नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेले टनेल बोअरिंग मशीन १६ डिसेंबर २०१९ रोजी भूगर्भात सोडण्यात आले होते. या मशीनने आज २९५ दिवसात ७९१ रिंगच्या सहाय्याने अप-लाईन भुयारीकरण पूर्ण केले.

“दादर मेट्रो स्थानक रहिवासी इमारती आणि व्यापारी आस्थापने यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मुंबई मेट्रो ३च्या स्थानकांपैकी एक महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे आजचा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करणं हे आव्हानात्मक होते. ” असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित सिंह देओल म्हणाले.

पॅकेज ४ मध्ये दादर सिद्धिविनायक आणि शितलादेवी या स्थानकांचा समावेश असून दादर स्थानकाचे ६१% काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण ९४ % भुयारीकरण आणि ९५ % खोदकाम पूर्ण झाले आहे .

संपूर्ण प्रकल्पाचा विचार करता ८७ % भुयारीकरण आणि ६० % बांधकाम पूर्ण झाले आहे….⭕

Previous article🛑 रिपब्लिकन पक्षाच्या ६३ व्या वर्धापनदिनी कोथरूड आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा 🛑
Next article🚫संभाजी बिडी च्या उत्पादन मालकावर गुन्हा🚫
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here