🛑 *पुणे. मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला* 🛑

0
216

🛑 *पुणे. मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे /पौड :⭕गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मयूर कॉलनी ते पौड फाटा यांना जोडणारा डी.पी. रस्ता हा लवकरच कोथरूडकरांसाठी खुला होणार आहे. यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

मयुर कॉलनी ते पौड फाटा या डीपी रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त आणि विविध विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसोबत करुन आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, एसआरए मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र निंबाळकर, स्थानिक नगरसेविका सौ. वासंतीताई जाधव, सौ. हर्षालीताई माथवड, पथविभाग प्रमुख श्री. व्ही.जी. कुलकर्णी, श्री. अनिरुद्ध पावसकर, महापालिका सहआयुक्त श्री. संदीप कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.

अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता गेली अनेक वर्ष या रस्त्यामधील असलेल्या भीमनगर मधील घरामुळे तो पूर्ण होवू शकत नव्हता. या घरांचा प्रश्न आता मार्गी लागला असून डीपी रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे.

गेली अनेक वर्षे सातत्याने यासाठी आपले प्रयत्न सुरु होते. या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांना बीएसयूपी आणि आर सेव्हनच्या माध्यमातून घर देण्याचे नुकतेच काम पूर्ण झाले. ही घरे राहण्यासाठी नागरिकांना ताब्यातही देण्यात आली आहेत. पूर्वीची रस्तावर असलेली घरे पाडण्याचे काम सुरू होत आहे.

रस्ता लवकरात लवकर खुला करण्यासाठी महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून नियोजन करण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन सर्व संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. रस्त्यामध्ये असलेली काही घरे असून ती घरे एसआरएच्या माध्यमातून हस्तांतरित केली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे झालेल्या कामाचे समाधान यामुळे मिळेल.

तसेच कोथरूडकरांना वाहतुकीच्या दृष्टीकोनातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे त्याचेही समाधान आहे….⭕

Previous article🛑 *पुण्यात ६९ जणांचा कोरोनाने मृत्यू* 🛑
Next article🛑 *छत्रपती संभाजी महाराजांना अखेरचे पाहणारा सरदेसाई यांचा वाडा….! कसबा संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here