🛑 ह्युंदाईच्या क्रेटाची रेकॉर्डब्रेक विक्री 🛑

0
43

🛑 ह्युंदाईच्या क्रेटाची रेकॉर्डब्रेक विक्री 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 4 ऑक्टोबर : ⭕ एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाईची खूप प्रसिद्ध कार क्रेटाचा जलवा कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२० मध्ये ह्युंदाई क्रेटा (All New Hyundai Creta) ने विक्रीत रेकॉर्ड बनवला आहे. गेल्या महिन्यात ह्युंदाईने ऑन न्यू क्रेटाची १२ हजार ३२५ युनिटची विक्री केली आहे. गेल्या २०१५ मध्ये या एसयूव्हीच्या लाँचिंग नंतर आतापर्यंतचे हे सर्वात जास्त नंबर आहे. तर ह्युंदाई कारच्या विक्रीत सप्टेंबर २०१९ च्या अपेक्षेपेक्षा २३.६० टक्के जास्त आहे.

ह्युंदाईने सप्टेंबर २०२० मध्ये आपल्या वेगवेगळ्या सेगमेंटच्या ५९, ९१३ कारची विक्री केली. ज्यात ५० हजार ३१३ युनिट भारतात विकली गेली. तर ९ हजार ६०० युनिट विदेशात विकली गेली. ह्यूंदाई क्रेटाने विक्रीत ह्युंदाई वेन्यू, ह्यूंदाई टक्सॉन आणि कोना ईव्हीसोबत भारतात धमाल केली आहे. किआ सेल्टॉसलाही मागे टाकले आहे. ह्यूंदाई क्रेटा आणि ह्युंदाई मोटर्सची मालकी असलेली कंपनी किआची एसयूव्ही किआ सेल्टॉसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टक्कर पाहायला मिळत आहे. किआने ऑगस्ट मध्ये १० हजार ६५५ सेल्टॉसची विक्री केली. तर ह्युंदाईने ऑगस्ट महिन्यात ११ हजार ७५६ क्रेटाची विक्री केली आहे. सप्टेंबर महिन्यात किआ सेल्टॉसची केवळ ९ हजार ७९ युनिटची विक्री केली. तर ह्युंदाई क्रेटाची १२ हजार ३२५ युनिटची विक्री केली. ह्युंदाई मोटर इंडियाच्या एसयूव्हीची सप्टेंबर २०२० मध्ये ह्युंदाई वेन्यूची ८ हजार ४६९ युनिटची विक्री केली. ह्यूंदाई टक्सॉनची ८५ युनिट आणि कोना इलेक्ट्रिक कारची २९ युनिटची भारतात विक्री केली. एमजी झेडएससोमर कोनाची विक्रीवर परिणाम झाला आहे.

२०१५ मध्ये ज्यावेळी ह्युंदाई क्रेटा लाँच करण्यात आली तेव्हापासून ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपला जबरदस्त लूक आणि जबरदस्त पॉवर मुळे आकर्षक बनली आहे. ज्यावेळी याचे अपग्रेड व्हर्जन लाँच केले. त्यावेळी याच्या फीचर्स बदलाची घोषणा करण्यात आली. नवीन ह्युंदाई क्रेटाची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप मॉडलची किंमत १७.२१ लाख रुपये आहे. ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे वैशिष्ट्यांमध्ये ३ इंजिन ऑप्शन मध्ये १४ व्हेरियंट्स येतात. १.५ लीटर डिझेल इंजिन ११५ बीएचपीचे पॉवर आणि २५० एनएमचे टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये येते. याचे डिझेल इंजिन एका लीटरमध्ये २१ किलोमीटर पर्यंत चालत असल्याचा दावा कंपनीचा आहे.⭕

Previous article*कौळाणेत विकासाच्या नावाखाली* *”अपना काम बनता भाड मे जाये जनता”!*
Next article🛑 शिवसेना वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक :- “आप” ची पोलिसांत तक्रार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here