🛑 पुणे जिल्ह्यातील कोविड-१९ व्यवस्थापनाबदल आढावा बैठक पार पाडली 🛑

0
53

🛑 पुणे जिल्ह्यातील कोविड-१९ व्यवस्थापनाबदल आढावा बैठक पार पाडली 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕आज कौन्सिल हॉल पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोविड 19 साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनाबद्दलची आढावा बैठक पार पडली.

यावेळी हडपसर विधानसभा मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या भागातील परिस्थिती सर्वांसमोर मांडली. एकूणच परिस्थितीत पूर्वीपेक्षा भरपूर सुधारणा झाली आहे. आता पुरेसे बेड्स उपलब्ध होत आहेत, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पुरेश्या प्रमाणात आहेत. रेमडेसीविर इजेक्शनचा मध्यंतरी तुडवडा होता, हे ही आता उपलब्ध आहेत. रुग्णवाहिका देखील आता लागलीच उपलब्ध होतात. टेस्टिंगच्या बाबतीत थोडे अधिकचे निर्णय घ्यायला पाहिजे. प्रशासन विशेषतः आयुक्त, विभागीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी विशेष सहकार्य दिले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी आहे.

या बैठकीला माझ्यासह राज्यसभा उपसभापती ऍड. वंदना ताई चव्हाण, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे उपस्थित होते…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here