🛑 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी , संभाजीराजे पुढाकार घेणार 🛑

0
46

🛑 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी , संभाजीराजे पुढाकार घेणार 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कोल्हापूर -⭕ राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची व्याख्या करतानाच धनगर बांधवांचाही त्यात समावेश करून त्यांना त्यावेळी आरक्षण दिलेले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जसा माझा लढा आहे, तसाच तो धनगर समाजासाठीही असणार आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी संभाजीराजे यांची न्यू पॅलेसवर भेट घेतली. ‘आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीचे नेते आहात; परंतु आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका तुम्ही जाहीर करावी,’ अशी विनंती शिंदे यांनी त्यांना यावेळी चर्चेत केली.

या बैठकीनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात आली. मला आनंद आहे की, संयोजकांनी यासाठी कोल्हापूरची निवड केली. कारण ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, वारसा आहे. शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात एस.टी., एन. टी., ओबीसी, मराठा समाजाचा समावेश होता.

आज राम शिंदे माझ्याकडे एवढ्यासाठीच भेटायला आले की, तुमचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा हवा. मी त्यांना सांगितले की, पाठिंबा मागण्याची गरजच नाही. राजर्षी शाहू महाराजांनी जनकबहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा विवाह यशवंतराव होळकर यांच्याशी केला. ती नाळ त्या वेळेपासून जुळलेली आहे. धनगर समाज हा प्रामाणिक आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी जशी त्यावेळी या समाजाविषयी जबाबदारी पार पाडली, तशीच ती आमचीही जबाबदारी आहे.

तर कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद झाली, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवतायेत, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे.

मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावं, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचं राम शिंदे यांनी सांगितले.⭕

Previous article*विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफच्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ* *खून करण्याचा डाव अखेर फसला*
Next article🛑 मराठा आरक्षणासाठी :- खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here