🛑 केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स 🛑

0
49

🛑 केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 2 ऑक्टोबर : ⭕ केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या गाईडलाइन्सनुसार उच्च शिक्षण संस्थांनी मंत्रालयाशी सल्लामसलत करून कॉलेज आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उघडण्यासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. कोविड-१९ ची त्या-त्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात स्थिती कशी असेल त्यानुसार उच्च शिक्षण संस्था उघडण्याबाबत निर्णय घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. दुसरीकडे, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे, उलट त्याला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

अनलॉक-५ च्या गाईडलाइन्सनुसार, केंद्रीय संस्थांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान शाखेच्या ज्या पदव्युत्तर विद्यार्थी आणि रिचर्स स्कॉलर्सना संशोधन कामासाठी प्रयोगशाळेची गरज आहे, त्यांना १५ ऑक्टोबरपासून संस्थेत येण्याची परवानगी द्यावी. मात्र, या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची खरंच किती आवश्यकता आहे, याबाबत संस्थाप्रमुखांनी चाचपणी करावी.

अन्य जे विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचे राज्य सरकारी आणि खासगी विद्यापीठांचे विद्यार्थी आहेत, त्यांना विद्यापीठ वा कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकारांनी घ्यावा, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शाळांसाठीही केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकारांना शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग संस्था टप्प्याटप्प्याने आणि परिस्थितीचं आकलन करून उघडण्याचा निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ते घेऊ शकतील. पण यासाठी सरकार शाळा किंवा शिक्षण संस्था व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करतील आणि दिलेल्या अटींचे पालन करतील. ऑनलाइन शिक्षण किंवा दूरस्थ शिक्षण चालूच राहिल आणि सतत प्रोत्साहन दिले जाईल. ज्या शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल.⭕

Previous article🛑 सॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु 🛑
Next article*कौळाणेत ग्रामपंचायतीचा कारनामा!* *असहमती म्हणजे काय रे भाऊ*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here