🛑 मराठा आरक्षणासाठी…! सुसाईड नोट लिहून, विद्यार्थीची आत्महत्या 🛑

0
42

🛑 मराठा आरक्षणासाठी…! सुसाईड नोट लिहून, विद्यार्थीची आत्महत्या 🛑
✍️ बीड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बीड :⭕सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला.

कोर्टाच्या या निर्णयानंतर शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे. बीड तालुक्यातील केतुरा येथील नीट परीक्षा दिलेल्या विध्यार्थ्याने आरक्षणाच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षाच्या विवेक राहाडे या विध्यार्थांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विवेकने नुकतीच नीट परीक्षा दिली होती.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्याची चिट्ठी लिहून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोषाची भावना झाली आहे. शिक्षण घेणारे तरुण निराश झाले आहेत….

याच नैराश्येतून एका उच्चशिक्षित तरुणाने लातूरमध्ये गेल्या आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला…….⭕

Previous article*मराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम टोप गावांत*
Next article🛑 पार्थ पवार, मराठा आरक्षणावरून आक्रमक :- सुप्रीम कोर्टात जाण्याचा दिला इशारा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here