🛑 संभाजीराजेंच्या भूमिकेला थेट विरोध :- सुरेश पाटील 🛑

0
45

🛑 संभाजीराजेंच्या भूमिकेला थेट विरोध :- सुरेश पाटील 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ मराठा समाजाला EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटकांत समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे . यांची भूमिका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील.यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सुरेश पाटील यांनी दिली…

संभाजीराजे यांनी EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

ही भूमिका मुख्यमंत्र्यांनीही मान्यही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यातील विसंवाद पुढे येताना दिसत आहे.

संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन सर्वांची मतं घ्यायला पाहिजे होती. काही संघटनांचं ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे, असं सुरेश पाटील म्हणाले.

उदयनराजे असावेत किंवा संभाजीराजे असावेत ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष देतात तिथपर्यंत ठिक आहे. पण नेतृत्व करु नये असं वाटतं.

कारण राजेंकडे नेतृत्व असताना त्यांना इतर समाजाचेही प्रश्न सोडवावे लागतील, असंही सुरेश पाटील यांनी नमूद केलं….⭕

Previous article🛑 स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार :- निलेश राणे 🛑
Next article🛑 गुन्हा दाखल होताच ” वाघ ” झाला पसार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here