माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे ; जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर

0
42

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे ; जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर

नांदेड, दि.३० : राजेश एन भांगे

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहीम अंतर्गत शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी करून शासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी आज दिनांक २७ रोजी कंधार येथे आपली व आपल्या कुटुंबीयांची आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत तपासणी करून घेत आवाहन केले.

भारत देशामध्ये, महाराष्ट्र मध्ये,व आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून या विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आता ग्रामीण भागांमध्ये देखील होऊ लागले आहे यामध्ये हजारो लोक बाधित होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या वतीने व नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारच्या उपाययोजना याठिकाणी करण्यात येत असून कंधार लोहा तालुक्यातील यंत्रणादेखील अत्यंत सक्षम पद्धतीने या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाला लागलेले आहे.
याच उपाय योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरुवात केली असून या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकांच्या कुटुंबीयांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केल्या जाणार आहे तरी या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबीयांची तपासणी करून घ्यावी व शासनास सहकार्य करावे.
आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,सौ.वर्षाताई भोसीकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या आरोग्याच्या सर्व तपासण्या करून घेतल्या याप्रसंगी त्यांनी कंधार व लोहा तालुक्यातील नागरिकांना असे आवाहन केले कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये नागरिकांनी अत्यंत सावधपणे वागून या संकटाला न घाबरता याचा मुकाबला केला पाहिजे यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे,वारवार हात धुने,सामाजिक आंतर बाळगने,अत्यावश्यक असेल तर घराच्या बाहेर पडणे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या संकटात आपला व आपल्या कुटुंबियांना बचाव करावा असे अहवाल संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कंधार लोहा तालुक्यातील नागरिकांना केले.

Previous article*दोन्ही राजांनी केंद्राच्या मदतीने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,* *केंद्रीय अध्यक्ष शरद पवार*
Next article🛑 1 ऑक्टोबरपासून गाडीत पेपर ठेवण्याची गरज नाही….! ट्रॅफिक पोलिस डिव्हाइसद्वारे तपासणी करणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here