🛑 कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे….! मारेकरी सापडले 🛑

0
45

🛑 कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे….! मारेकरी सापडले 🛑
✍️ नागपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ कुख्यात गुंड बाल्या बिनेकर हत्याकांड प्रकरणात नागपूर पोलिसांनी 24 तासात .मुख्य सूत्रधारासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी चेतन हजारेने जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ..

या प्रकरणी पोलिसांनी चेतन हजारे, रजत तांबे, भरत पंडित या तीनही आरोपींना रामटेकमधून अटक केली.

नागपूरच्या भोले पेट्रोल पंप चौकात काल सिनेस्टाईल खूनकरुन हे आरोपी फरार झाले होते.

या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा उलगडा केला आणि तीनही आरोपींना अटक केली.

नागपुरात कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची
(26 सप्टेंबर) पाच अज्ञात इसमांनी सिनेस्टाईल हत्या केली होती. ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोले पेट्रोल पंपाजवळ घडली होती ..

बाल्या बिनेकराचं नागपुरात सावजी भोजनालय आहे. त्याचबरोबर तो जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर काही हल्लेखोर पाळत ठेवून होते. हल्लेखोरांनी बाल्या बिनेकरच्या कारमागे बाईकने पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळ आल्यावर त्यांनी बाल्याची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी बाल्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाल्या बिनेकरचा जागीच मृत्यू झाला….⭕

Previous article🛑 सरकार पडेल तेव्हा बघू ….! फडणवीसांचे वक्तव्य 🛑
Next article*मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here