🛑 *आंबेगाव तालुक्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”….! मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी* 🛑

0
42

🛑 *आंबेगाव तालुक्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”….! मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

आंबेगाव/पुणे :⭕सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, यासाठी मंचर येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, व भाजप पक्षाचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांचे समवेत बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, सभापती संजय गवारी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे आदी उपस्थित होते.

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे.

या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देत आहे. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील.

सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोठी मोहीम राबविण्यात येत आहे. स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी सर्वांनी एकत्र मिळून ही मोहीम यशस्वीरित्या राबाऊया व कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी काम करूयात.⭕

Previous article🛑 *मुलीच्या संगोपनावरून प्रियकराने केला प्रेयसीचा खून * 🛑
Next article🛑 *बातमी: राज्यात सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here