🛑 विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली….! शरद पवारांची भेट 🛑

0
51

🛑 विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली….! शरद पवारांची भेट 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (२८ सप्टेंबर) भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची काही वेळ चर्चा झाली. नांगरे पाटील यांनी शरद पवार यांची नेमकी भेट का घेतली याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती.

दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली….⭕

Previous article🛑 मराठा समाजा तर्फे विविध मागण्यांसाठी वेंगुर्ले तालुका तहसीलदारांना निवेदन 🛑
Next articleमोफत रेशन घेण्यासाठी…..! लागणार नाही रेशनकार्ड :-  सरकारने बदलले नियम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here