*व-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या चौकशीची मागणी*

0
54

*व-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या चौकशीची मागणी*
मालेगांव,(दिपक भावसार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे गावातील ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांच्या चौकशीच्या मागणीसाठी काल युवा मराठा न्युज चँनलच्या वतीने गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे व उपविभागीय अधिकारी विवेकानंद शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात श्रीमती सांळुखे यांच्या कारभाराचा पंचनामा करण्यात आला असून,त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन गावात एका वाचनालयाला कोणत्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने जागा दिलेली आहे.त्याशिवाय गावात बहुतांश कामे हि नित्कृष्ठ दर्जाची व बोगस झालेली आहेत.व सदरचे कामे हि आपल्याच मर्जीतल्या ठेकेदाराला व मजुर संस्थेला देऊन भ्रष्टाचार झाला आहे.त्यामुळे त्याचीही चौकशी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.त्याशिवाय व-हाणे गावी युवा मराठा न्युजच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव यांना सदरच्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनीच मराठी शाळेजवळील गावठाण जागेवर सार्वजनिक पाणपोई सुरु करण्याची कल्पना सुचविली,आणि त्या पाणपोईचे उदघाटन देखील तत्कालीन सरपंच श्रीमती संगिता पवार व ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्याच उपस्थितीत पार पडलेले आहे व तशा स्वरुपाचे वृत देखील त्यावेळी प्रसारीत झालेले आहेत,सदरची जागा पत्रकार भवनच्या बांधकामासाठी मागणी करण्याची सुचनादेखील ग्रामसेविका सांळुखे यांनीच केली होती,आणि आता नियमानुसार पत्रकार भवनसाठी जागा मागणी केल्यावर आणि शासनाचे परिपत्रक जी.आर.व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांचे नियमानुसार पत्र देऊनसुध्दा सदरची ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे मुद्दामच पत्रकारांची अडवणूक करुन जागा देण्याकामी टाळाटाळ करुन मनमानी करीत असल्याच्या निषेधार्थ काल युवा मराठा न्युजच्या वतीने मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,संपादक राजेंद्र तुकाराम पवार,व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,कार्यकारी संपादक संजय महाले,विभागीय संपादक निंबा जाधव,वृतसंपादक प्रमोद पवार,नाशिक जिल्हा प्रतिनिधी दिपक भावसार,कळवाडी प्रतिनिधी जगदिश बागूल,मालेगांव प्रतिनिधी ,निमगांव प्रतिनिधी विशाल हिरे, कन्हैयालाल ढोढरे,आंशूराज पाटील राऊत,तुषार बाळू बच्छाव,आदीनी गटविकास अधिकार जितेंद्र देवरे व उपविभागीय अधिकारी विवेकानंद शर्मा यांची भेट घेऊन ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या चौकशीची मागणी केलेली आहे.

Previous article*जिल्ह्यात आज अखेर 32 हजार 749 कोविड रूग्णांना डिस्चार्ज*
Next article*कौळाणेतील विकास कामांच्या नावाने तीनतेरा नऊबारा* *झालेली कामेच होतायेत उध्वस्त*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here