*जिल्ह्यात आज अखेर 32 हजार 749 कोविड रूग्णांना डिस्चार्ज*

0
55

*जिल्ह्यात आज अखेर 32 हजार 749 कोविड रूग्णांना डिस्चार्ज*

*कोल्हापूर प्रतिनिधी ( युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यात आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 309 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 86 निगेटिव्ह तर 216 अहवाल पॉझीटिव्ह आहेत (7 अहवाल नाकारण्यात आले). अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 366 प्राप्त अहवालापैकी 326 निगेटिव्ह तर 40 पॉझीटिव्ह (136 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 375 प्राप्त अहवालापैकी 297 निगेटिव्ह तर 78 पॉझीटिव्ह असे एकूण 334 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 43 हजार 777 पॉझीटिव्हपैकी 32 हजार 749 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 630 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 334 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-21, भुदरगड- 9, चंदगड-19, गडहिंग्लज-21, हातकणंगले- 32, कागल-20, करवीर-35, पन्हाळा- 18, राधानगरी-8, शाहूवाडी-11, शिरोळ-22, नगरपरिषद क्षेत्र- 53, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 59 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-782, भुदरगड- 1061, चंदगड- 992, गडहिंग्लज- 1211, गगनबावडा- 128, हातकणंगले-4811, कागल-1521, करवीर-5082, पन्हाळा- 1701, राधानगरी-1146, शाहूवाडी-1154, शिरोळ- 2284, नगरपरिषद क्षेत्र-6708, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 328 असे एकूण 41 हजार 909 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 868 असे मिळून एकूण 43 हजार 777 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 43 हजार 777 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 32 हजार 749 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 398 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार 630 इतकी आहे.

Previous article*कडुनिंब चविला कडू पण फायदे अनेक ,१३०प्रकारची औषधी गुण*
Next article*व-हाणेतील वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या चौकशीची मागणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here