*कडुनिंब चविला कडू पण फायदे अनेक ,१३०प्रकारची औषधी गुण*

0
60

*कडुनिंब चविला कडू पण फायदे अनेक ,१३०प्रकारची औषधी गुण*

कोल्हापूर प्रतिनिधी ( युवा मराठा न्युज )

आपल्या आसपास रस्त्याच्या कडेला , रानावनात कडुनिंबाची झाडे विपुलतेने आढळतात. त्यामुळे त्यांचे आपल्याला काही अप्रुप नाही. विशेषत: त्याचे अनेक औषधी उपयोग आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपल्या भोवताली एवढी लिंबाची झाडे असल्याची आपल्याला काही किंमतही नाही. पण अमेरिकेतलेे शास्त्रज्ञ म्हणतात की या झाडाचे १३० प्रकारचे औषधी उपयोग आहेत. पण अमेरिकेत लिंबाची झाडे दिसत नाहीत. एखादा अमेरिकी जैवतंत्रज्ञ भारतात येतो तेव्हा विपुलतेने दिसणारी कडुलिंबाची झाडे पाहून तो हरखून जातो. अमेरिकी शास्त्रज्ञ कडुलिंबाच्या झाडाला मॅजिक ट्री म्हणतात.
अलीकडे आपल्याही देशात या झाडाचे महत्त्व लोकांना कळले असून त्यापासून काही औषधे तयार करण्यात येत आहेत.
सध्या सगळ्या जगालाच सतावणार्‍या विषाणूजन्य आजारांवर तयार करण्यात येणार्‍या औषधांत कडुलिंबाचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या झाडाचा पाला, बिया म्हणजे लिंबोळ्या, साल, खोड, मूळ असे सारेच घटक औषधी गुणधर्माचे असतात.
आता आपल्या देशात लिंबोळीची पेंड खत म्हणून वापरायला लागलेले आहेत. शिवाय लिंबाच्या पाल्याचा अर्क पिकांवर फवारला जात असतो. तो कडू असल्यामुळे तो त्या झाडाच्या अंगात भिनतो आणि त्याचा परिणाम असेपर्यंत त्या पिकावर कसल्याही रोग कीडीचा प्रादुर्भाव होत नाही. लिंबाच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. मुंबई सारख्या शहरात लिंबाची झाडे कमी आहेत किंबहुना दिसतच नाहीत मात्र शहरातल्या लोकांना सकाळी प्यायला लिंबाच्या पानाचा अर्क लागतो. म्हणून लगतच्या जिल्हतून अनेक आदिवासी दररोज पाला शहरात आणून विकतात.
अलीकडे झालेल्या संशोधनात लिंबाचे पाच नवे गुणधर्म आढळले आहेत. १.कँसरच्या पेशींची संख्या मर्यादित करणे. नियंत्रणात ठेवणे. २. हाडांना मजबुती देणे ३. पचन क्रिया सुधारणे ४.व्हायरल इन्फेक्शन निष्प्रभ करणे आणि ५. बुरशी प्रतिबंधक

Previous article🛑 *पुणे पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला दिलासा* 🛑
Next article*जिल्ह्यात आज अखेर 32 हजार 749 कोविड रूग्णांना डिस्चार्ज*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here