🛑 NEET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर 🛑

0
42

🛑 NEET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 27 सप्टेंबर : ⭕ ज्या उमेदवारांनी नीट २०२० परीक्षा दिली, त्या उमेदवारांनी नीट २०२० ची उत्तरतालिका पडताळून पाहता येईल. ही उत्तरतालिका नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ntaneet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नीट २०२० ची उत्तरतालिका पाहू शकाल. याशिवाय या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरूनही विद्यार्थी उत्तरतालिका पाहू शकतील.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व सेट्ससाठी (E1-E6, F1-F6, G1-G6, H1-H6) उत्तरतालिका जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी या आन्सर की नुसार स्वत:च्या गुणांची पडताळणी करावी. अंतिम उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल..

आन्सर कीबाबत जर कोणाला काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्याबाबतची सविस्तर सूचना नंतर जारी केली जाईल. मात्र, सध्या कोणत्याही प्रकारचे मेल विद्यार्थ्यांनी करू नये, हरकतींविषयीची स्वतंत्र सूचना करणयात येईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कळवले आहे.

सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. देशभरात ३,९०० पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर ही तीन तासांची पेन-पेपर परीक्षा दिली गेली. कोविड – १९ च्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले होते. परीक्षा २ वाजता सुरू झाली होती तरी, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात ११ वाजल्यापासून विविध स्लॉट्सनुसार बोलावण्यात आले होते. ही परीक्षा पूर्वी ३ मे रोजी होणार होती. ती कोविडमुळे दोन वेळा लांबणीवर पडली. आधी ती २६ जुलै रोजी होणार होती, पण करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन ती आणखी एकदा पुढे ढकलण्यात आली आणि १३ सप्टेंबर रोजी अखेरीस ती देशभरात पार पडली.⭕

Previous article🛑 WhatsApp मध्ये येत आहे टॉप फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स 🛑
Next articleमराठा समाजाची समाज जागृती दुसरी मोहीम चावरे गावांत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here