🛑 Maruti Suzukiच्या या कारवर जबरदस्त डिस्काऊंट 🛑

0
43

🛑 Maruti Suzukiच्या या कारवर जबरदस्त डिस्काऊंट
🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 25 सप्टेंबर : ⭕ जर येणाऱ्या काही दिवसांत गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीच्या कारसाठी विचार करण्यास हरकत नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनदरम्यान, मारुती सुझुकीकडून आपल्या कारवर जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे. मारुती सुझुकी आणि त्यांच्या डिलरशीपकडून देण्यात आलेला डिस्काऊंट विविध राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळा असू शकतो.

1) Tour H2 (P & CNG) मॉडेलवर 60,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार New Dzire (MT) (AMT) वर 40000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. यात 10000 रुपयांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 25000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर सामिल आहे. AMT वेरिएंट जवळपास 24 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देतं. या कारची दिल्ली एक्सशोरुम किंमत 5,89,000 रुपयांपासून सुरु आहे. ओल्ड डिझायर एडिशनमध्ये 30000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

2) ऑल्टो 800 (पेट्रोल आणि सीएनजी)

मारुती ऑल्टो 800 वर 38000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. यात 18000 रुपयांपर्यंत कंज्यूमर ऑफर, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर सामिल आहे. या कारची दिल्ली एक्सशोरुम किंमत 2,94,800 रुपयांपासून सुरु आहे.

3) New WagonR पेट्रोल आणि सीएनजी

New WagonR पेट्रोल आणि सीएनजीवर या महिन्यात 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. WagonR पेट्रोलवर 10000 रुपये कंज्यूमर ऑफर, 20000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत स्पेशल सेल्स ऑफर आहे. सीएनजीमध्ये केवळ कंज्यूमर ऑफर 15000 रुपये आहे.

4) Celerio

मारुतीच्या हॅचबॅक सेलेरियोवर या महिन्यात 50000 रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Celerio (पेट्रोल आणि सीएनजी) (MT) (AMT) वर सध्या कोणताही दुसरा डिस्काऊंट नाही.⭕

Previous article🛑 रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक नियुक्त 🛑
Next article🛑 *कोरोनाचे शहरात ८७२ नवे रुग्ण* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here