🛑 *सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने परळ डेपोत ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन* 🛑

0
44

🛑 *सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने परळ डेपोत ST कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई : मुंबईतील परळ डेपोमधून महत्तवाची येतेय. परळ डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. यामध्ये चालक आणि वाहक दोघांचा समावेश आहे. परळ मधील काही कर्मचाऱ्यांना ST सेवा समाप्तीची ऑर्डर दिल्याने हे काम बंद आंदोलन.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे, पालघर आणि मुंबई डेपोमधील कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. अशात एकीकडे पगार न देता हे तीनही डेपो मिळून जवळपास ८४ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्त करण्यात आलेली असल्याची माहिती आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या डेपोत अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या चालक आणि वाहकांना प्रत्यक्षात काम करूनही अद्याप पगार दिलेला नाही.

तीन महिन्यांचा पगार जो इतर विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आला तोही इथल्या कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याचं इथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं. काहींचा एप्रिलपासून पगार झालेला नाही. ST च्या कारवाईच्या प्रोसेस प्रमाणे १८४ लोकांना परळ आगारात चार्जशीट देण्यात आलेलं. त्या चार्जशीटचा जोवर निकाल लागत नाही तोवर त्यांना पगार देण्यात येत नाहीत, असं इथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितलं .

तर आणखी एका कर्मचाऱ्याशी याबाबत बातचीत केलं असता ते म्हणालेत, ४८ तासात मला कामावर हजर व्हायला सांगितलं होतं त्यानंतर मी २४ तासातच कामावर हजर झालो होतो. सोमवारी अर्ज करून मला हजरही करून घेण्यात आलं. मात्र मी गाडी घेऊन निघालो तर मला थांबण्यात आलं आणि सांगितलं गेलं, की तुमची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

दरम्यान आता या पार्श्वभूमीवर मुंबईतील परळ डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु करण्यात आलंय. यामध्ये परळ डेपोतील तब्बल शंभर कर्मचारी सहभागी झालेत……⭕

Previous article🛑 जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका 🛑
Next article🛑 रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक नियुक्त 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here